Sunday, October 4, 2015

बाल धोरण

बाल धोरण

महाराष्ट्र शासनाच्या बालधोरणाची पार्श्वभूमी...
    भारतामध्ये बालकांसंबधी अनेक कायदे अस्तित्वात असले तरी त्यापैकी बरेच कायदे आंतरराष्ट्रीय बाल हक्क परिषदेच्या परिमाणाची पूर्तता करण्यास अपुरे पडत होते म्हणून १९७४ साली "राष्ट्रीय बाल धोरण" जाहीर करण्यात आले होते. त्या आधारावर महाराष्ट्रात बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने २००२ साली, बाल विकास धोरण निश्चित केले. आंतरराष्ट्रीय बाल हक्क परिषदेने सुचविलेले बालकांचे हक्क व अधिकार आणि त्या अनुषंगाने करावयाच्या तरतुदी विचारात घेऊन महाराष्ट्राचे पहिले बाल विकास धोरण तयार करण्यात आले. बालकांच्या विकासासाठी, रचनाबद्ध, सर्वकष व नियोजित विकास साधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न राहील अशी आशा ह्या धोरणाची संकल्पना होती. वर्ष २००२ च्या धोरणात सुनिश्चित केले होते की जागतिकीकरणाच्या युगात सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक गरजांचे स्वरूप ही बदलत असते. या बदलाशी महाराष्टाचे धोरण सुसंगत राहण्याच्या दृष्टीने या धोरणापर्यंत घेतलेल्या निर्णयांचे पुनर्विलोकन करण्यात येईल. त्यानंतर बराच कालावधी लोटला असून बरेच बदलही घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात बालकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी नवीन बाल विकास धोरण निश्चित करणे हि काळाची गरज आहे. बाल हकांवर भर देणारी अनेक कलमे भारतीय संविधानात समाविष्ट आहेत. त्यातील कलम ३९ (ई) व (एफ) मध्ये असे म्हटले आहे की, "बालकांचा विकास सुयोग्य वातावरणात होऊ शकेल असे बाल हक्क विषयक धोरण राज्यामध्ये ठरविण्यात येईल. तसेच बालकांचे स्वातंत्र्य व प्रतिष्ठा असलेल्या वातावरणात त्यांचे बालपण किंवा किशोरावस्था यांचे रक्षण आणि नैतिक अध:पतन व भौतिक प्रभाव यातून उद्धवणा-या शोषणापासून राज्य संरक्षण करील.” त्याप्रमाणे बालकांसाठी २००३ साली जी राष्ट्रीय सनद प्रसारीत करण्यात आली होती, यामध्ये “एकही बालक उपाशी, अशिक्षित किंवा आजारी राहणार नाही.” या बालकांविषयीच्या राष्ट्रीय दायित्वाचा पुन:रुच्चार करण्यात आला आहे. बालकांच्या काळजी वसंरक्षण तसेच विकासाकरीता प्रत्येक नियम, अधिनियम कायदा- जसे की बालन्याय (काळजी व संरक्षण) कायदा (२०००, २००६ व २०११ मध्ये सुधारणा), मोफत व सक्तीचा शिक्षम कायदा (२००९), बालविवाह प्रतिबंधक कायदा (२००६), बालकामगार प्रतिबंधक कायदा (१९८६), अनैतिक वाहतुक प्रतिबंधक कायदा (१९५६) व सुधारित (१९८६), हिंदू दत्तक व पोटघी कायदा (१९५६), पालक व पाल्य अधिनियम (१८९०), केंद्रीय दत्तक संसाधन प्रधिकरणाची मार्गदर्शक तत्वे (२०११) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करणारा कायदा (२०१२) आणि विविध संस्था ल विभाग जसे महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, एकात्मिक बाल विकास योजना, एकात्मिक बाल संरक्षण योजना यांसारख्या योजना विकसित झाल्या आहेत.
         एकही बालक विकासाच्या व संरक्षणाच्या प्रक्रियेतून वंचित राहू नये, याची खात्री या धोरणाव्दारे केली जाईल. सहस्त्रक विकास उद्दिष्टांनुसार बालकांच्या व किशोरांच्या सुदृढ आणि यशस्वी विकासासाठी तसेच त्यांच्या आरोग्य, शिक्षण, पोषण व विकास व संरक्षण यांसाठी खात्री देण्यात आली आहे. आरंभीच्या बालपणातील संगोपन आणि शि७ण यांवरील राष्ट्रीय धोरण केंद्रशासनाच्या महिला व बालविकास विभागाने तयार केले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने बालक हक्क विषयक अधिवेशन घेतले व सनद तयार केली. त्या सनदेवर भारताने ११ डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब केले. संयुक्त राष्ट्रसंघाने २४ फेब्रुवारी २०१० रोजी बालकांच्या पर्यायी संगोपनासाठी जी मार्गदर्शक तत्वे स्वीकारली आहेत, त्यानुसार जी बालके पालकांच्या संगोपनापासून वंचित आहेत किंवा तशी स्थिती निर्माण होण्याचा धोका बालकांना आहे, अशा बालकांची सुरक्षितता व स्वास्थ जपणे, त्यांना संस्थांतर्गत संरक्षण देणे, पालकांकडे सोपविणे आणि जर हे शक्य नसले तर अन्य सुयोग्य व कायंस्वरुपी उपाय शोधणे असा आहे.
         महाराष्ट्र राज्य, भारतीय संविधान आणि आंतरराष्ट्रीय कायदे व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील करारांचे पालन करण्यास कटिवद्ध आहे. बालकांना हक्कांवर आधारित अशा चौकटीत उत्कृष्ट दर्जाचे संगोपन, संरक्षण, विकास व त्यांच्या सक्षमीकरणाची हमी महाराष्ट्र राज्य देते. महाराष्ट्र राज्य बालकांच्या विकास कार्यक्रमासंदर्भात पुरोगामी दृष्टीकोनासाठी सर्वपरिचीत आहे. तरीसुद्धा अजूनही अनेक संवेदनशील व दुर्बल कुटुंबे अशा आहेत की, जेथाल बालकांना विकासासाठी समान संधी मिळविण्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बदलत्या सामाजिक, आर्थक आणि राजकीय संदर्भानुरुप हे चित्रही बदलत आहे. उदा. वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे घरे व आश्रयस्थाने, मुलभूत सोयीसुविधा या सर्वांचा अभाव व असंघटीत कामगारांमध्ये मोठी वाढ यासारखे विषय प्रामुख्याने पुढे आलेले आहेत. जरी राज्याच्या एकूण आर्थिक प्रगतीमध्ये वाढ होत असली तरी मानवी विकास निर्देशंकामध्ये जिल्हा पातळीवर असणारी विषमता हा काळजीचा विषय आहे. बालकामगारांचे प्रश्न, मोठ्या प्रमाणवर असणारी स्थलांतराची लोकसंख्या, सहा वर्षांखालील मुलांचे कुपोषण, कमी होणारे लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्ये आणि देशामध्ये वाढत जाणारे अवैध्य व अनैतिक
 मानवी व्यापाराचे प्रमाण, बालकांना पळवून नेणे याबरोबरच बालकांविरुद्धच्या गुन्ह्यंमध्ये धक्कादायक प्रमाणात वाढ, लैंगिक शोषण, बाल भिक्षेकरी आणि अनाथाची उपेक्षा व पिळवणूक यांसारखे विषय राज्य आणि सर्वांसाठीच अतिशय चिंतेचे आहेत. बाल न्याय यंत्रणेविषयक बहुतांश पूरक घटक कार्यरत असतानासुद्धा बाल न्याय विषयक कायद्याची प्रभावीपणे अंसलबजावणी होण्यासाठी, सर्व यंत्रणा बळकट करणे गरजेचे आहे. संबंधित विभागांच्या कार्यवाहीचा बालकांच्या जीवनावर परिणाम होणार आहे म्हणून बालक धोरण राज्यातील विविध विभागांना कार्यप्रवण करणारे असून, बालक धोरण बालकांसंबंधीची विद्यमान धोरणे, कायदे, कृतिआराखडा आणि कार्यक्रमांची माहिती देईल व त्यासंदर्भात मार्गदर्शन करेल.
         राज्यातील सर्व बालकांच्या तसेच विशेषत: जे वंचित, मागास व दुर्बल घटकाखालील आहेत या वर्गासाठी न्याय, भेदभावरहीत, समता, प्रतिष्ठा, संरक्षण, संगोपन, स्वातंत्र्याच्या अधिकारासाठी प्रभावी व परिणामकारक उपाययोजना करण्याकरीता तसेच त्यांना सुरक्षित ठेवण्यास कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रथा, परंपरा, सांस्कृतिक व धार्मिक आचार, व्यवहारांस, बालकांच्या हक्कांवर मर्यादा व प्रतिबंध घालण्यास परवानगी दिली जाणार नाही अशी खात्री व हमी राज्य शासन याव्दारे अंगीकृत करीत आहे.
(य़ेथे असांग्नमेंट प्रमाणे १० ब्लॉग संपले... पण नक्की आवडेल अजून वेग-वेगळ्या विषयांचा अभ्यास करून, वाचून, नवी माहिती मिळवून ब्लॉग बनवायला... धन्यवाद!)

ही माझी मुले आहेत...२

ही माझी मुले आहेत...२


       छडी लागे छम-छम विद्या येई घम-घमकाय आठवल का गाणं खरे तर ही एक आपल्याकडची जुनी शिकवणच आहे. याचा शारिरीक शिक्षण, बालकांच्या मनस्थितीचा, बालविकासाचा काही संबंध आहे का? असा प्रश्न मला सातत्याने पडत असतो. याबाबत बरेच मंथन झाले व बालकांच्या शिक्षेच्या संदर्भात १९९३ नंतर बालहक्क संहिता जाहीर झाली आणि बालकांच्या शिक्षेकडे गांभीर्याने पाहू जाऊ लागले.
२००८ च्या राष्ट्रीय बाल सुरक्षा हक्क समितीच्या एका अहवालानुसार विविध शारिरीक शिक्षा भागल्यानंतर त्यातील किमान १० विद्यार्थांनी हात्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
बालकांना शिक्षा या कुटुंब म्हणजेच घरी, शाळा, वसतिगृहे, आश्रमशाळा, बालगृहे, अनाथाश्रम (अनाथालय) या ठिकाणी होते. शिक्षकाला आपल्या देशात अधिक महत्त्व आहे, उच्च स्थान आहे. आपण शिक्षकाला पुजतो. पण जेंव्हा शिक्षकच मुलांचे मनोबल कमी करतात तेंव्हा काय म्हणायचे हा प्रश्न उद्भवतो. शिक्षक एका छोट्याशा पालवीला पाणी स्वरुप ज्ञान देत असतात, खतस्वरुप संस्कार, शिकवण, आत्मविश्वास देत असतात. यामुळे हळू-हळू ते रोपटे होते, त्या वृक्ष बनण्याची ताकद देत असतात. पण काही आदिवासी जसे त्यांच्या शेतीकरण्याच्या जागेत कोणतेही झाड येत असेल तर ते सर्वजण मिळून त्याल खूप वाईट बोलतात, शिव्या देतात मग ते झाड काही दिवसांत आपोआप मरून जाते. तसेच काही या मुलांचे होत असेल पण ही बिचारी मुलं तर त्यांच्या मध्यात ही येत नाहीत. या मुलांसाठीच शिक्षकांना कामावर ठेवलेले असते.
भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाने २००७ मध्ये बालकांवरील अत्याचार या विषयावर केलेल्या संशोधन अभ्यासातून भारतातील ६९% बालके ही शारिरीक अत्याचाराचे बळी आहेत. कुटुंबातून होणारे शारिरीक अत्याचार ८८.६% तर शाळा, बालगृहे, अनाथालय येथे ७०.२१% शारिरीक अत्याचार होत असल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले.
आपल्या देशात बालकाला खडू फेकून मारण्यापासून ते बालकाला जीव गमवावा लागेपर्यंत भयानक स्वरुपाच्या शिक्षा शाळेमध्ये घडल्याच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत.
बालकांना होणारी शिक्षा या विषयावर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाने वर्ष २००९-२०१० मध्ये शारिरीक शिक्षा: भारतीय बालकांचे वास्तवया विषयाचा ७ राज्यांचा संशोधनपर अभ्यास केला. यामध्ये, ३ ते १७ वयोगटातील बालक, राज्य, केंद्र, अनोंदणीकृत शाळांची मुले यांना सहभागी करून घेण्यात आले होते. आंध्रप्रदेश, दिल्ली, राजस्थान, तमिळनाडू, पश्चिम-बंगाल, ओरीसा, मध्यप्रदेश या सात देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले होते.
1) मानसिक विशेषणे लावणे ८१.०%
2) छडीने मारणे ७५.०%
3) थोबाडीत मारणे ६९.९%
4) पाठीत धपाटा मारणे ५७.७%
5) कान पिळणे ५७.५%
6) वर्गाच्या बाहेर उभे करणे ५७.४%
7) पट्टीने हातावर मारणे ५३.०%
8) हातवर करून उभे करणे ५१.०%
9) कोंबडा बनविणे - ४२.७%
10) जनावरांच्या नावाने मुलांना हाक मारणे ४०.७%
11) गुडघ्यावर उभे राहणे ३८.८%
12) चिमटा घेणे २६.९%
13) हाडावर मारणे २३.६%
14) बाकावर उभे करणे २३.१%
15) केस ओढणे २१.६%
16) होत पिरगळणे १९.२%
17) शौचालयास जाण्यास परवानगी न देणे – 17.9%
18) मैदानावर पळायला लावणे १५.३%
19) एका पायावर उभे करणे १२.२%
20) गैरभाषेत बोलणे (अश्लील) १४.५%
21) पेन-पेन्सिल बोटाच्या मध्ये दाबणे १२.२%
22) जात व समाजाला उद्देशून बोलणे १०.१%
23) नाक दाबणे ६.८%
24) दोन मुलींच्या वेण्या बांधणे २.८%
25) खुर्ची-टेबलला बांधून ठेवणे १.२%
26) भीती दाखवणे ०.८%
27) विजेचा झटका देणे ०.४%
बालकांना शिक्षा कोणत्या कारणामुळे झाल्या,
१ शैक्षणिक कारणे- गृहपाठ न करणे, वह्या-पुस्तके न आणणे, प्रश्नांची उत्तरे न ऐकणे, पेन न आणणे,
२ बालकांच्या वर्तनासंबंधी आणि गरजांसंबंधी- वर्गात बोलणे, मस्ती करणे, लपून डबा खाणे, दुस-याचा डबा चोरून खाणे, शौचास जास्त वेळ लावणे, शौचास जाण्यासाठी सारखे सारखे विचारणे.
३ शालेय व्यवस्थापनाचा आदेश पाळणे- गणवेश व्यवस्थित नसणे, गैरहजर राहणे, वस्तू-पुस्तके न आणणे, नमस्कार न करणे, पालकांस न आणणेँ, फी न भरणे, वेण्या न बांधणे (मुलींसाठी), शूज न घालणे.
अशा एक ना अनेक कारणांसाठी मुलांना शिक्षा होत असते. अस वाटत आपण वाटच पाहत असतो की मुल काधी चूक करतायत आणि आपण त्यांना कधी धडा शिकवतोय. अगदीच काही मी सगळ्यांच्या विरोधात नाही पण आपल्याकडे वेगळे पर्याय आहेत. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेले आहे. असच चाललंय ना मग चालू द्या म्हणत. बदल ही काळची गरज असते, नाहीतर आपणच काळच्या ओघात आपल अस्तित्व हरवून बसतो. पर्याय नसतील तर शोधू शकतो. शोधल्याने सर्वच सापडते फक्त हिच्छा शक्ती पाहिजे आहे.
मुले ही देवाघरची फुले त्यांना अशाप्रकारे पायदळी तुडवणे कितपत योग्य आहे. खरे तर तुम्ही विचार करायला हवा. हे बघा, साधी गोष्ट आहे आपण एखाद टेबल, साईड कॉर्नर बनविताना त्याचा कोपरा कसा ठेवतो, तो स्मूथ करून घेतलेला असतो की टोकदार एखाद्याचे रक्त काढेल असा? छोटी गोष्ट आहे पण मोठा विचार आहे. मुलांचा विचार आपण काहीही करताना प्रथम त्यांच्या सोयीनुसार केला पाहिजे. त्याने आपल्यालाच लाभ होणार. ही मुले उद्याच भविष्य आहेत. त्यांना कमी लेखून कसे चालेल. आज आपण स्मार्ट सिटीज ची चर्चा करतोय पण यात मुलांसाठी काही आहे का की त्यांना ही नेहमी प्रमाणे गृहित धरलेले आहे.
तर मुलांसाठी आपण विविध पर्याय शोधू त्यांना समजावण्याचे, शिकवण्याचे..


(ही माझी मुले आहेत छोटीशी ब्लॉगची मालिका संपलेली आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण वाचू शकता महाराष्ट्र सरकारचे बाल धोरण...)

ही माझी मुले आहेत....

ही माझी मुले आहेत....


       मुंबई सारख्या शहरात आई बाबांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नसतो म्हणून मग ते मुलांसाठी गुंतविण्यासाठी विविध पर्याय शोधत असतात. मग मुले थोडी मोठी झाली कि मग ट्युशन क्लास, शाळा, अभ्यास यात ही मूले व्यस्त होतात. आई-बाबा स्वतः लक्ष देत नसले, तरी त्यांच्या मुलांकडून अपेक्षा मात्र खूप असतात. असेच एका रविवारी सायंकाळी रडण्या-ओरडण्याचा आवाज येत होता. असा आवाज आल्यावर साहजिकच मनात शंकांचे घर तयार होते. कुठून आवाज येतो हे शोधण्याचा प्रयत्न केला असता असे समजले कि बाजूच्या फ्लॅट मधूनच आवाज येत आहे.
साधारण सायंकाळची ७ ची वेळ, एका घरातून मुलांचा मोठ-मोठ्याने रडण्या-ओरडण्याचा आवाज येत होता. कोठून आवाज येतो हे पाहण्यासाठी मी बाहेर गेले तर बाजूच्या घराचा दरवाजा थोडा उघडा होता, त्यातून काही हलकेसे दिसत होते, मी पाहिले की बाजूच्या आन्टी त्यांच्या मुलाला धबा-धब मारत होत्या व त्यांची लहान मुलगी ते पाहून खूप घाबरुन रडत होती. ती मध्येच बोलली आई नको तर तिच्या दोन थोबडीत लगवल्या. मी त्यांच्या घरात गेले व आन्टींचा हात पकडला व सांगितले काय झाल ऐवढ मारयला, जीव जायीस्तोवर मारणार अहात का? असे म्हटल्यावर त्या रागात म्हणाल्या ही माझी मुलं आहेत, मी काय करायच ते करेन यांच्यासोबत तू मध्ये बोलायच नाही, तुझा काही अधिकार नाही. नवीन आहेस इथे.. मी निघून गेले. नंतर मुलांकडून समजले कि परीक्षेचा निकाल आलेला व त्यात कमी गुण मिळाले होते आणि तरिही त्यांचे टि.व्ही पाहणे चालू होते. अन् त्यांची आई आधीच वैतागली होती ऑफिसच्या वर्कलोडमुळे आणि त्यात तिच्या मैत्रिणीच्या मुलाला चांगले गुण मिळालेले, त्यामुळे या सर्वांचा राग मारण्यतून काढला...
आपण आपल्या मुलांना वस्तू समजतो का? आपण त्यांना जन्म दिला म्हणून त्यांच्यावर मालकी हक्क गाजवायचा का? त्यांच्याकडे एक वेगळी व्यक्ती म्हणून बघण्याची गरज आहे. शिस्तीच्या नावाखाली मुलांवर हात उगारणे हे योग्य नाही, याचा अर्थ असा होतो की पालकांमध्ये दोष आहे. लहान मुल म्हणजे एक मातीचा गोळा असतो त्याला आपण आकार देत असतो, एक रुप देत असतो, त्यात वैशिष्ट्ये आणतो, त्याला घडवतो. ते मूल मोठ्यांकडे बघतच शिकत असते, त्यामुळे त्याच्याकडे तुमचेच दुर्गुण व चांगले गुण दिसतात. हम भी कभी बच्चे थे! हा विचार पालकांनी करायला हवा. मुलांना विशेषणे लावण्यापूर्वी, मी अनेकदा पाहिले आहे मुल नीट अभ्यासात रस घेत नसेल त्याला गुण चांगले मिळत नसतील तर पालक स्वत:च मुलाला ठरवून मोकळे होतात. काय होत असेल त्या मुलाच जेंव्हा त्याचेच आई-बाबा त्याला समजून घेत नाहीत. चूक करणे पाप पण माणूस हा चुका करण्यासाठीच आहे. अनेक मोठ-मोठ्या लोकांनी त्यांच्या आयुष्यात चुका केलेल्या आहेत. अने जरा स्वत: कडे ही पहा तुम्हीही अनेक चुका केलेल्या आहेत. जेंव्हा तुम्हीत मुलाच्या टिचरला सांगता याने काही ऐकले नाही तर द्या लगाउन दोन-तीन. अरे काय काळीज आहे की नाही..? जेंव्हा शिक्षकांना म्हणता तुम्हीच बघा किंवा तुम्हीच लक्ष द्या, मग तुमची जबाबदारी काय? फक्त पैसे कमावून देणे. अहो, त्या भौतिक सुखांपेक्षा तुमच्या मुलाला, तुमच्या मायेची गरज आहे, तुमची साथ हवी आहे त्याला. एखाद पप्पी, एखाद मिठी त्याला तुमच्या खूप जवळ आणते हो. त्याचा हात पकडून शिकवणे.. चुकल तर समजावून सांगणे, आणि मुख्य दुस-याचा राग त्या मुलावर न काढणे.. नाहीतर तुमच मूल तुमच्यापासून किती दूर गेलेलं असेल ना ते तुम्हाला ही कळणार नाही, जेंव्हा समजेल तेंव्हा वेळ गेलेली असायची आणि तेंव्हा तुमची इच्छा असूनही तुमचं मूल परत येणार नाही. बघा विचार करा आपण कुठे आहोत, काय करतोय.. (८)

(पुढील ब्लॉग मध्ये आकडेवारी निशी या समस्येकडे पाहू...)

नि:शब्द – कायद्यातील काही प्रमाणके – ७

नि:शब्द – कायद्यातील काही प्रमाणके – ७

       अ)     लिंग प्रवेश: 
       
अनुक्रमणिका
पूर्व दाखले
आधार
लिंग प्रवेश आगदी थोड्या प्रमाणात असला तरी, तो बलात्कार होय.
रणजीत हजारिका विरुद्ध आसाम राज्य सरकार [१९९८ (८) एस.एस.सी ६३५]
बलात्कार आहे हे सिद्ध करण्यासाठी, योनीचा पडदा फाटलेला असणे जरुरी नाही.
रणजीत हजारिका विरुद्ध आसाम राज्य सरकार [१९९८ (८) एस.एस.सी ६३५]
बलात्कार आहे हे सिद्ध करण्यासाठी, वीर्य बाहेर पडलेले असणे गरजेचे नाही.
महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध चंद्रशेखर केवल जैन [१९९० (१)] एस.सी.सी ६७२



) अनुभूती:
अनुक्रमणिका
पूर्व दाखले
आधार
प्रत्यक्ष जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झालेला असण्याची गरज नाही. गुन्ह्याची धमकी ही ग्राह्य मानली जाते.
महाराष्ट्र राज्य सरकार विरुद्ध प्रकाश (१९९३) (१) एस.सी.सी ६७२.
तसेच, महाराष्ट्र सरकार विरुद्ध प्रियशरण महाराज व इतर १९९७ (४) एस.सी.सी ३९३.
जखम नसणे ही बाब फिर्यादी पक्षाला घातक ठरत नाही.
राजस्थान सरकार विरुद्ध एन्. के २००० (५) एस.सी.सी ३०
पिडीत व्यक्तीला आरोपीने जबरदस्तीने नमवल्याचा प्रयत्न केल्याचा पुरावा व पिडीत प्रतिकार करू न शकल्याचा पुरावा आणि वैद्यकीय तपासणीचा पुरावा या कोणत्याही पुराव्याने आरोपी बलात्काराचा गुन्हेगार आहे असे सिद्ध होते. या परिस्थितीत अनुमती असल्याचा अनुमान लावता येत नाही.
मुखेटा बेलाकोट विरुद्ध आंध्रप्रदेश सरकार (१९९२ सी.आर्.एल.जे. २२३६ ए.पी.)

इ) वय:

अनुक्रमणिका
पूर्व दाखले
आधार
सामान्यत: अनुमतीचे वय १८ वर्षे आहे. भारती. दंड संहितेनुसार अनुमतीचे वय १६ वर्षे मानले जाते. संशयास्पद परिस्थितीत वय ठरविण्याचा फायदा पिडीताला मिळावा.
कर्नाटक विरुद्ध पंजाब २००० (६) (२) एस्.सी.सी १८८.
वय ठरविण्यासाठी जन्म दाखला उपलब्ध नसतो. न्यायालयाला संबंधित व्यक्तीच्या तपासणीतून निष्पन्न झालेल्या वयाच्या शारिरीक वैशिष्ट्यावरुन, तोंडी पुराव्यावर आधारीत आपला निष्कर्ष काढावा लागतो.
सिद्धेश्र्वर गांगुली विरुद्ध पश्चिम बंगाल सरकार (ए.एस.आर) १९५८. एस.सी. १४५).

) कार्यपद्धती व पुराव्याची जमवा जमव:

अनुक्रमणिका
पूर्व दाखले
आधार
गुन्हा घडल्याची नेमकी वेळ व तारीख उल्लेखलेली नसेल तरी ते कार्य पद्धतीला घटक ठरत नाही.
चित्तरंजन दास विरुध्द पश्चिम बंगाल सरकार (१९६४ (3) एस.सी.आर २३७).
तसेच,
तसेच, महाराष्ट्र सरकार विरुद्ध प्रियशरण महाराज व इतर १९९७ (४) एस.सी.सी ३९३.
बलात्काराच्या प्रकरणात बळी व्यक्तीच्या पुराव्याला दुजोर्याची गरज असल्याबद्दल कायद्याचा किंवा व्यावहारिक शहाणपणाचा नियम नाही.
महाराष्ट्र राज्य विरुद्ध एम.एन. कार्दीकर (ए.आय.आर. १९९३ ए.सी. 207).

ई) वैद्यकीय पुरावा:

       अनुक्रमणिका      
पूर्व दाखले
आधार
बलात्काराच्या प्रकरणातवैद्यकीय पुराव्याची महत्वाची भूमिका आहे. पिडीत व्यक्तीचा पुरावा व वैद्यकीय पुरावा यामुळे बलात्कार सिध्द झाला कि आरोपीच्या खोट्या निवेदनाच्या सत्रास चालू दिले जात नाही.
कन्नम लक्ष्मीनारायण विरुध्द पोलिस निरीक्षक नरसारावपेट (१९९६ सी. आर.एल.जे. ३३४ ए.पी.).
उ) शिक्षा ठोठावणे :

       अनुक्रमणिका      
पूर्व दाखले
आधार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणे तसेच तिला ठार मारणे यासाठी फाशीची शिक्षा आहे व त्यासाठी पुढील दोन प्रयोजने आहेत.
* इतरांना अशा तऱ्हेचा गुन्हा करण्यापासून रोखणे.
* अशा तऱ्हेच्या गुन्ह्यांना समाजात असलेल्या तिरस्कार विरुध्द जोरदार अभिव्यक्ती किंवा प्रत्युत्तर देणे.
कामत तिवारी विरुध्द मध्यप्रदेश सरकार (ए.आय.आर. १९९६ एस.सी. 2800).
बलात्कार करणारा किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा शिक्षेपासून वाचू शकत नाही. कारण तो सामाजाविरुद्धाचा क्रूर गुन्हा मनाला जातो.
बलात्कार करणारा किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न करणारा शिक्षेपासून वाचू शकत नाही. कारण तो सामाजाविरुद्धाचा क्रूर गुन्हा मनाला जातो.
(अशा प्रकारे ही नि:शब्द च्या ब्लॉगची मालिका संपलेली आहे. यानंतरचा ब्लॉग ही बालहक्कांवरच आहे वाचायला विसरू नका.)


नि:शब्द झालेल्यांना मिळाले कायद्याचे शब्द (ताकद)- ६

नि:शब्द झालेल्यांना मिळाले कायद्याचे शब्द (ताकद)- ६
       
प्रकरण ७ (पासून पुढे चालू..)
४.       बालकाचा जबाब व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे किंवा एकतर्फी आरसा, पडदा किंवा उपलब्ध असलेल्या योग्य त्या वस्तूचा वापर करून घेतला जावा जेणेकरून बालकावर दबाव येणार नाही व तो किंवा ती मोकळेपणाने बोलू शकेल.
५.       न्यायालयाचे कामकाज इन कॅमेरा म्हणजे खुल्या कोर्टात न होता न्यायाधीशांच्या चेंबर मध्ये केले जाईल. बालकाचे पालक किंवा विश्वासातील व्यक्तीला यावेळी बलाकासोबत राहण्याची परवानगी असते.प्रकरण विशेष न्यायालयाकडे आल्यावर ३० दिवसांत पुरावे नोंदवले जातील. एका वर्षाच्या आत प्रकरणाचा निकाल लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
६.       केयादेशीर शिक्षेव्यातिरिक्त विशेष प्रकरणात न्यायालय बालकाचे पुनर्वसन किंवा उपचारासाठी थेट आर्थिक तरतूद करण्यास सांगू शकते.
७.       पालकांना आवश्यकता वाटल्यास वकीलही  नेमू शकतात.
८.       आरोपी व्यक्ती १९ वर्षाखालील असेल तर ते प्रकरण बाल न्यायालय अधिनियम (मुलांची आणि संरक्षण) २००० या कायद्याकडे वर्ग केले जाईल.

प्रकरण ८
विशेष न्यायालयाची प्रक्रियाअधिकार आणि पुराव्याची नोंद करणे
१ आरोपीचे वकील आपले प्रश्न न्यायालयाकडे देतील आणि न्यायाधीश ते प्रश्न बालकाला विचारातील.
२ न्यायालयाच्या कामकाजादरम्यान बालकाला विश्रांतीची गरज आहे असे जाणवल्यास न्यायाधीश बालकासाठी अधून मधून विश्रांतीची सोय करू शकतात.
३ बालकाला मोकळे वाटेल असे मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा न्यायालय प्रयत्न करेल.
४ बालक किंवा विश्वासातल्या व्यक्तीला पलक सोबत राहण्याची किंवा थांबण्यासाठी परवानगी असेल.
५ साक्ष देण्यासाठी बालकाला वारंवार न्यायालयात बोलावले जाणार नाही.

प्रकरण ९
संकीर्ण किंवा इतर बाबी
१ राज्य सरकार न्यायालयाच्या कामाकाजापुर्वी व ते चालू असताना बालकाला मदत करण्यासाठी असलेल्या तज्ज्ञांसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करेल.
२ बालकाच्या वैद्यकीय तपासणीसाठी पालक किंवा पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीची संमती घेतली जाईल.
३ आरोपीने केलेल्या गुन्ह्यासाठी इतर कोणत्याही कायद्यात अधिक कडक शिक्षा असेल तर ती दिली जाईल.
४ या कायद्या बद्दल जन जागृती साठी दूरचित्रवाणीनभोवाणी किंवा इतर माध्यमांचा वापर केला जाईल. हि जबाबदारी राज्य सरकार तसेच मध्याबार्ती सरकारची हि असेल.
५ संबंधित अधिकाऱ्यांना आणि इतर व्यक्तींना वेळोवेळी प्रशिक्षण दिले जावे
६ दोन्ही सभागृहाचे एकमत झाल्यास न्याय मिळवण्यात अडसर असलेले नियमकायदा लागू झाल्यापासून २ वर्षाच्या आत बदलत येतील. सरकारी वापरत मध्यवर्ती सरकार अशा बदलाचे अद्यादेश जरी करू शकते.

  लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ मध्ये, प्रत्येक बाबी ध्यानात ठेवून तपशीलवार या कायद्याची मांडणी केली असल्याते आपल्याला वाचताना समजले. आपण ब-याचदा कायदे वाचत नाही पण त्यांच्यावर टिका मात्र करतो, कित्येतदा कोणातच्या प्रभावाखाली येऊनही आपण असे वागतो. कायदे वाचायला आपल्याला बोर होत. पण; हेच कायदे माहिती असेल तर आपण कोणाची मदत करू शकतो, त्या विषयावर भाष्य करू शकतो. आपल्याला कुठेही-कधीही कायद्याची गरज लागू शकते. भारतात संविधान ही एकच गोष्ट आहे जी संपूर्ण देशाला एकत्र बांधून ठेवते.
        
  सर्वोच्च न्यायालय आणि अन्य उच्च न्यायालये यांनी न्यायपीठाच्या मध्यस्तीव्दारे किंवा निवाड्याव्दारे लैंगिक गुन्ह्यांची प्रमाणके निश्चित करण्याचा प्रयत्व केला आहे. अशा काही प्रकारची यादी खास तुमच्यासाठी...

बालकांच्या बाबतीतील दुव्यवहार व लैंगिक शोषण यांना लागू असलेली व लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित अशी सर्वसाधारण तत्त्वे:

(या ब्लॉग मध्ये कायदे संपून काही उदाहरणांना सुरुवात करायची आहे. खरे तर ती काही प्रमाणके आहेत. पुढील ब्लॉग मध्ये याबाबतचे तक्ते असतील. आपण त्यात पूर्व दाखले व आधार या अनुशंगाने काही घडलेल्या कोर्टातील खटल्यांची उदाहरणे ही असतील. प्रत्यक्ष कोर्ट मध्ये कशाप्रकारे दाखले दिले जातात याचा अंदाज त्या तक्त्यातील उदाहरणांतून येईल. हे सर्व आपण पुढील ब्लॉग मध्ये पाहू आणि हो पुढील ब्लॉगचे नाव नि:शब्द कायद्यातील काही प्रमाणके ८ असे अहे.)