नि:शब्द – २
लैंगिक शोषणाविषयी बोलताना किंवा चर्चा करताना अनेक लोक
म्हणतात की देशात अनेक समस्या आहेत. लहान मुले अन्नाविना मरत आहेत पण त्यावर चर्चा
नको तुम्हाला, असल्याच गोष्टींवर बोला असे म्हणून हे लोक च्रची टाळत. खरे पाहता,
रस्त्यावर राहणारे लोक, ज्यांना दोन वेळेचे अन्न ही नीट मिळत नाही ह्या लोकांना
मुले मात्र असतातच आणि याच मुलांना पुढे कुपोषणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे
लैंगितेवर बोलणे किती गरजेचे आहे हे यावरुनच समजून येते. अनेकदा लैंगिकतेवर बोलणे
हे सोयीस्करपणे टाळले जाते. जगभरात अनेक विषयांवर टॅबू आहे. तसे आपल्याकडे
लैंगिकते विषयी. जास्त प्रश्न विचारू नकोस, मोठा किंवा मोठी झाल्यावर समजेल अशी
उत्तरे लहानपणी ऐकलेली असतात. जे करू नको सांगितल्यावर आपण ते करतोच ही मानवी
प्रवृत्तीच आहे. त्यामुळे मुले ते त्यांच्या पौगंडावस्थेनुसार, त्यांच्या
गरजेप्रमाणे बरोबर जाणून घेतात, पण चुकिच्या मार्गाने. जेंव्हा हेच त्यांचे
आई-बाबा त्यांच्या पासून हे लपवत असतात तेंव्हा मुलांना माहिती झाल्यावर तेही
लपवतातच. शी..घाण.. म्हणून याविषयी बोलणे टाळतात. शाळेच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हा
विषय अभ्यासाकरीता घेतला तर आमच्याकडे शिक्षक ते शिकवतच नाहीत. लैंगिक शिक्षण
शालेतून शिकवण्याचा उपक्रम महाराष्ट्रात व-याच ठिकाणी फोल ठरला. पण जापद्धतीने
अत्याचाराच्या तक्रारी येत आहेत, घटना समोर येत आहेत त्यामुळे लोकांमध्ये जागृकता
निर्माण होत आहे. काही अंशी तरी लोकांना विषयी बोलण्याची गरज वाटू लागली आहे.
माध्यमांतून यावर सातत्याने चर्चा होत आहे. माध्यमे लोकांना नेहमीच प्रभावीत करत असतात.
एकदा
आम्ही परिषदे मध्ये बसलो होतो. आम्हाला वृत्तपत्रात आलेली एक बालमी वाचण्यास दिली
होती. ती वाचल्यावर एक बाई पटकन म्हणाल्या, ३ वर्षांच्या नाती सोबत आजोबा असे वागू
शकतात? अहो हे तर एक उदाहरण आहे. अनेक घरांत अनेक घटना घडत असतात, पण ते त्या
चौकटीच्या बाहेर पडण्याची मानसिक शक्तीच ठेवत नाहीत आपण नि:शब्द च्या पहिल्या
ब्लॉग मध्ये पाहिले की, आशाताईंनी व त्यांच्या पतीने गप्प न बसता, अन्याय सहन
करायचा नाही असे ठरविले आणि त्या विरुद्ध लढा दिला. स्वत:चा सख्खा भाऊ असूनही
त्यांनी प्रत्यक्ष व जाणून-बुजून केलेल्या चुकिची शिक्षा देण्यासाठी न्यायालयाची
मदत घेतली.
जागतिक
आरोग्य संघटनेने बालकांच्या होणा-या लैंगिक शोषणाची व्याख्या स्पष्ट करताना असे
सांगितले आहे की, ‘बालकासोबत केलेले कोणतेही अश्लील कृत्य, जे बालकाला समजू शकत
नाही आणि जे कृत्य करण्यासठी पौढ व्यक्ती बालकाला आमिष दाखवून त्याच्या किंवा
तिच्या सोबत बळजबरीने अश्लील कृत्य करतात त्यास लैंगिक शोषण असे म्हणतात.’
भारतात सुमारे ४० लाख पोर्नोग्राफी साईटस् आहेत. मध्यंतरी
त्यातील काही साईचस् बंदही करण्यात आल्या होत्या. पण नंतर देशातील अश्लील संकेतस्थळांवर
(पॉर्नोग्राफिक) थेटपणे बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. मात्र, हा विषय गंभीर असून, त्यासंदर्भात केंद्र सरकारने आवश्यक पावले उचलली पाहिजेत, अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली.
चेन्नईमध्ये,
तुर्लार या सामाजिक संस्थेने २००६ मध्ये शालेय मुलांचे सर्वेक्षण केले.
सर्वेक्षणात फक्त एकच प्रश्न होता. तुमच्यावर कधी लैंगिक शोषणाचा प्रसंग उद्भवला
आहे का? हे क्लोज एंडेड सर्वेक्षण होते. त्यातून असे आढळले की, ४२% बालके ही
लैंगिक शोषणाचे बळी ठरलेले आहेत. यात मुले व मुली या दोहोंचा समावेश होता.
जागतिक संघटनेच्या आकडेवारी नुसार १५ कोटी मुली तर ७ कोटी
३० लाख मुले लैंगिक शोषणाचे बळी ठरलेले आहेत. ही आकडेवारी २००७ मधील आहे.
२००७ मध्ये भारत सरकारच्या महिला आणि बालकल्याण विकास
मंत्रालयाने बालकांचे शोषण या विषयावर भारतातील एकूण १३ राज्यांची स्थिती जाणून
घेण्यासाठी संशोधात्मक अभ्यास केला. १५ वर्षांच्या आतील ५२.९४% मुले तर ४७.६% मुली
ही बाल पिडीतांची आकडेवारी एकूण देशातली आहे. तर, महाराष्ट्रात ४९.४३% मुले व
५०.५७% मुली अशी शोषितांची आकडेवारी आहे. आपण फक्त मुलींवर बंधने लादतो (दुस-याचे
धन असे मानून) पण मुलांचे काय? त्यांच्यावर ही ब-याचदा अतिप्रसंग ओढवतात. असे
आपल्याला या सर्वेक्षणांतून दिसून आलेले आहे.
लैंगिक शोषणामध्ये बालकांचे जबरदस्ती चुंबन घेणे, अश्लील
साहित्य दाखवणे, अवयवांना स्पर्श करणे, बलात्कार.
बालकाचे शोषण करण्यामध्ये ५०% व्यक्ती हा बालकाच्या जवळचा
नोतेसंबंधातील असतो.
भारतीय संस्कृती, मूल्ये, संस्कार या नावाखाली शोलेय
शिक्षणातून लैंगिक शिक्षण देण्याचा प्रयत्न पूर्ण तर झाला नाही. पण स्वत: पालकांनी
पुढाकार घेऊन हे कार्य करावे. या शिक्षणातून मुले व मुली यांना चांगले विचार,
शिकवणूक यातून त्यांना समोरच्या व्यक्तीकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन व मानसिकता
बनेल अन् तेच खरे संस्कार असतील...
(नि:शब्द-२ नंतर, नि:शब्द झालेल्यांना कायद्याची साथ कशी
मिळते ते पाहू पुढील ब्लॉग मध्ये...)

No comments:
Post a Comment