Sunday, October 4, 2015

नि:शब्द झालेल्यांना मिळाले कायद्याचे शब्द (ताकद) – ४

नि:शब्द झालेल्यांना मिळाले कायद्याचे शब्द (ताकद) – ४


प्रकरण – २ (पासून चालू..)

            5 गंभीर स्वरुपाचा भेदणारा लैंगिक अत्याचार (अॅग्रेवेटेड् पेनेट्रेटीव्ह सेक्शुअल अॅसॉल्ट) :

      I.        पोलिस अधिकारी जेंव्हा असा अत्याचार करतो, तेंव्हा त्याच्या कार्यक्षेत्रात असताना, कामावर असताना किंवा नसताना, गणवेश असताना किंवा नसताना जिथे तो पोलिस अधिकारी म्हणून ओळखला जातो.
    II.        लष्करातील किंवा सुरक्षा दलातील व्यक्तीने या प्रकारचा लैंगिक अत्याचार केला असता तो त्याच्या कार्यक्षेत्रात असतना किंवा नसताना, गणवेशात असताना किंवा नसताना, जिथे तो त्याच्या लष्करातील किंवा सुरक्षा दलातील अधिकारी म्हणून ओळखला जातो.
   III.        सरकारी करमचारी उदा. तुरूंगातील कर्मचारी रिमांड होम, सुरक्षा गृह किंवा कायद्याने बालकांना ठेवण्यासाठी, काळजी घेण्यासाठी निश्चित केलेली जागा अशा ठिकाणच्या बालकासोबत गंभीर स्वरुपाचा भोदणारा लैंगिक अत्याचार करतो.
  IV.        सरकारी किंवा खाजगी दवाखान्याचे कर्मचारी किंवा व्यवस्थापक त्या दवाखान्यामधील बालकावर असे अत्याचार करेल तर,
    V.        शिक्षण संस्था किंवा धार्मिक संस्थेशी संबंधित व्यक्ती बालकावर अशा प्रकारचा अत्याचार करेल तर,
  VI.        जेंव्हा एक गट सामुहिक भेदणा-या लैंगिक अत्याचाराचा हेतू साध्य करण्यासाठी अशा कृतीमध्ये सहभागी होतो तेंव्हा प्रत्येकाला तेवढेच दोषी समजले जाईल.
 VII.        भयंकर शस्त्र, आग, गरम पदार्थ किंवा कोणतीही त्रासदायक वस्तू घेऊन बालकाच्या शरीराला किंवा लैंगिक अवयवाला इजा करतो.
VIII.        ज्या कारणमुळे बालक मनोरुग्ण बनेल किंवा नैसर्गिक क्षमतांवर विघातक परिणाम होईल, बालक काही काळासाठी किंवा कायमस्वरुपी काही नैसर्गिक कृती करू शकणार नाही.
  IX.        अशा लैंगिक अत्यचारामुळे बालिका गरोदर राहिली असेल तर,
    X.        अशा लैंगिक अत्यचारामुळे बालकाला एच्.आय.व्ही. किंवा जीवाला धोका पोहोचणा-या कोणत्याही रोगाची लागण झाली असता,
  XI.        बालकाच्या अपंगत्वाचा फायदा घेऊन लैंगिक अत्याचार केला असता,
 XII.        एकाहून अधिक वेळा बालकावर भेदणारा लैंगिक अत्याचार केला असता,
XIII.        12 वर्षांच्या आतील बालकाबरोबर लैंगिक अत्याचार केला असता,
XIV.        रक्ताचे नाते असेल, दत्तक विधीमुळे अगर लग्नामुळे नाते निर्माण झाले असेल, पालकत्व स्वीकारलेल्या व्यक्तीने भेदक लैंगिक अत्याचार केला असता,
XV.        बालकाला सेवा पुरविणा-या संस्थाची प्रमुख व्यक्ती, व्यवस्थापक मंडळातील व्यक्ती अथवा कर्मचारी यांच्याकडून भेदक लैंगिक अत्याचार केला असता,
XVI.        बालकाचा विश्वास असलेल्या किंवा बालकावर अधिकार असलेल्या व्यक्तीने भेदक लैंगिक अत्याचार केला असता,
XVII.        बालिका गरोदर आहे हे माहिती असताना देखील तिच्यावर भेदक लैंगिक अत्याचार केला असता,
XVIII.        भेदक लैंगिक अत्याचार करून बालकाला मारून टाकण्याचा प्रयत्न केला असता,
XIX.        जतीय किंवा वांशिक दंगलीचा फायदा घेऊन अत्याचार केला असता,
XX.        त्या व्यक्तीला यापूर्वी ही अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी शिक्षा झालेली असेल तर,
XXI.        बालकावर भेदक लैंगिक अत्याचार करून त्याला नग्न करून त्याची धिंड काढली असता,

६ शिक्षा:
वरील कुठल्याही गुन्ह्यांसाठी सश्रम कारावास किमान १० वर्षे किंवा आजीवन कारावास वा दंड किंवा दोन्हीही होऊ शकते.

७ लैंगिक अत्याचार:
लैंगिक कृतीच्या भावनेने योनी मार्ग, लिंग, गुदव्दार, छातीला स्पर्श करणे किंवा बालकाला तसे करण्यास प्रवृत्त करणे, इतर कोणत्याही भावनेने केलेली लैंगिक कृती ज्यामध्ये स्पर्श आहे; मात्र लिंग प्रवेश नाही.

८ शिक्षा:
वरील गुन्ह्यांसाठी किमान ५ ते ७ वर्षे सश्रम किंवा साधा कारावास तो १० वर्षांपर्य़ंत वाढू शकतो. तसेच दंड ही होऊ शकतो.

९  लैंगिक छळ:
अ)     लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे, आवाज काढणे, हावभाव करणे किंवा लैंगिक अवयव प्रदर्शन करणे.
आ)    बालकाला लैंगिक अवयव दाखविण्यास प्रवृत्त करणे
इ)      अश्लील हेतूने बालकाला वस्तू अथवा साहित्य दाखविणे.
ई)      बालकाचा किंवा बालिकेचा पाठलाग करणे वा एकाक पाहत राहणे (यात प्रत्यक्ष किंवा इलेक्ट्रोनिक साधनाचा वापरही असू शकतो)
उ)     बालक किंवा बालिके बरोबरच्या ख-या अथवा खोट्या लैंगिक कृतीचे फोटो किंवा चित्रफित याचा धमकी देण्यासाठी उपयोग करणे.
१०  शिक्षा: वरील गुन्ह्यांसाठी ३ वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंड अशी शिक्षा होते.

(नि:शब्द झालेल्यांना मिळाले कायद्याचे शब्द (ताकद) – ४ मध्ये वाचले की, कोणत्या पातळीवर जाऊन लोक हे कृत्य करतात ते करतात म्हणूनच अशा प्रकारचे कायदे करावे लागतात. पुढतच्या ब्लॉग मध्ये आपण लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ तील पुढील तरतुदी पाहू.)


1 comment:

  1. Casinos Near Me - The Arcade in Atlantic City, NJ
    Find the best Casinos Near Me 당진 출장안마 in Atlantic City 경상북도 출장마사지 NJ near 계룡 출장안마 The Arcade in Atlantic City, NJ in real-time 순천 출장안마 and see 전라북도 출장마사지 activity.

    ReplyDelete