नि:शब्द
उन्हळ्याचे
दिवस चालू होते. दुपारी दोन-अडीच च्या सुमारास आशाताई भेदरलेल्या अवस्थेत
आपल्या पाच वर्षांच्या मुलीला कडेवर घेऊन बाहेर जात होत्या. त्या घाईत होत्या. तितक्यातच, ओS आशाताई..SS , आशाताई..SS अशी हाक आली.पण आशाताईंचे लक्षच नव्हते. त्या त्यांच्याच विचारात मुलीला हृद्याशी कवटाळून भरधाव वेगाने चालत
होत्या. आशाताईंचे
पाय जलद गतीने पुढे-पुढे जात होते. पायाला भिंगरी लावल्यासारखी त्यांच्या चालीची
गती होती. अन् अचानक चालता-चालता त्यांचे पाय जाऊन थांबले ते स्त्री रोग तज्ज्ञ
डॉ. निलीमा देशपांडे यांच्या क्लिनिक जवळ….
आशाताई
फ्लाईंग स्वान या बालहक्क संघटने सोबत गेल्या ७-८ वर्षांपासून काम करत आहेत. एक
समाजसेवक म्हणून त्यांनी इतकी वर्षे कामे केली, अनेक
कुटुंबांचे, मुलांचे जीवन बदलविले-घडविले.
आशाताई,
दुपारी कधीच घरी नसतात अगदी क्वचित सुट्टीच्या दिवशी पण त्यांनी आज
खास वेळ काढला होता त्यांच्या मुलीसाठी, त्यांच्या मुलीला
प्रेमाने सर्व छकुली म्हणतात. छकुलीची खूप दिवसांपासूनची हिच्छा त्यांनी घरी राहून
पूर्ण केली. तिच्यासाठी खास बेत बनवला, खेळणी काठून ठेवलेली
पण अचानक छकुलीबद्दल त्यांच्या काही लक्षात आले व त्या तिला घेऊन थेट घरातून निघून
त्या डॉ निलीमांकडे गेल्या.
दुपारची वेळ
असल्यामुळे क्लिनिक मध्ये फारशी गर्दी नव्हती पण डॉक्टरही निघण्यच्या तयारीत
होत्या. त्यांनी आपल्या मैत्रिणाला पाहिले हातातली बॅग खाली ठेवत म्हणाल्या ‘’हे! हाय.. आज कशी आलीस?” पण आशाताईंचा चेहरा पाहून त्यांनी विचारले “काय
झाल..? काही प्रॉब्लेम? “ही माझी छकुली”
आशाताई सांगतात. त्यावर लगेच डॉ. निलीमा “वाव! किती गोड आहे गं तुझी
लेक..” असे
म्हणतात. पण आशाताई आपल्या मुलीच्या योनीजवळ किंवा योनीच्या ओठांना आलेले पुरळ
दाखविण्याकरीता आलेल्या असतात.
डॉ निलीमा व आशाताई यांनी
यापूर्वी अनेक प्रकरणांत एकत्र काम केलेले होते, त्यांच्यात घट्ट मैत्री तर होतीच आणि दोघींनाही समाजकार्याची आवड. पण हे
त्यांच्यासाठी प्रकरण नव्हते. डॉक्टरानी तपासले, टेस्ट
करण्यासाठी काही सॅम्पल घेतले. नेहमी सतत बोलणारी आपली मैत्रीण आज बोलत का नाही
म्हणून आशाताईंनी डॉक्टरांना विचारले की “काय झालयं नक्की?”
हे विचारताना, त्या मानात प्रार्थना करत
होत्या जे प्रथम दर्शनी दिसत आहे; ते नसू दे प्लीज...
पण व्हायचं तेच होत ना..
डॉक्टरांनी सांगितले की हा ‘बलात्कार’च आहे. असा शिक्कामोर्तब होणे हा आशाताईंच्या मनाला मोठा धक्काच होता.
त्यांनी लगेच भावनांना आवरले व स्वत:ला सावरत त्या मुलीजवळ गेल्या अन् तिला घट्ट
मिठी मारली. आता आशाताईंना काही गोष्टी उमगल्या, की आपली
मुलगी गेले काही दिवसांपासून अशी का वागत आहे ते.. हे कसे घडले असले? कोणी केले असेल? हे प्रश्न त्यांच्या डोक्यात
त्यावेळी सतत फिरत होते.
पुढे तिच्या
ट्रिटमेंटच्या पुढच्या टप्प्याला म्हणजेच समुपदेशनास सुरुवात झाली. तेंव्हा तिला
विविध गोष्टिंनी चित्रांमार्फत विविध गोष्टी विचारण्यात आल्या. खेळून-गप्पा मारून
तिच्या मनातल्या सर्व गोष्टी बाहेर काढल्या गेल्या. तिला असे ही विचारण्यात आले की
“तुझ्या चड्डीत कोणी हात आतलेला का?” नक्कीच
हा प्रश्न थेट नव्हता पण असे सर्व तिला विचारुन, कथा सांगून
तिला बोलते करण्यात आले. मग यावरुन आशाताईंना त्यांची उत्तरे मिळाली व आणखी एक
धक्का बसला.
आशाताईंच्याच घरात हे
इतक्या दिवसांपासून चालू होते पण त्यांना थांगपत्ता ही लागला नाही. त्यांचा सख्खा
दीर, त्यांच्या मुलीचा वापर खेळण्यासारखा करत होता. गम्मत
करुया अस म्हणून तिचा काका महिन्याभरापासून तिच्या योनीशी खेळत होता. आता
आशाताईंवर दडपण होते ते नात्याचे. समस्या ग्रस्त लोकांची स्थिती त्यांनी जवळून
पाहिली होती. पण म्हणतात स्वत: अनुभवल्याशिवाय दु:ख कळत नाही ते, त्यांनी याबाबत त्याच्या पतीशी बातचीत केले. सर्व घटना ऐकून तातडीने ते
मुंबईत आले. त्यांना लगेच विश्वास बसला पण सर्व बाबींची पडताळणी करुन त्यांना खरे
काय ते समजलेच, कारण सत्य कधी दडून राहत नाही ना.. त्यांनी
भावाची चौकशी केली, मग त्यांना समजले की तो ही नुकताच
ट्रिपहून आलेला आहे. त्याला संध्याकाळी घरी बोलावून घेतले सर्व सांगण्यात आले पण
तो खोट बोलू लागला. पण सर्वच गोष्टी त्याच्या विरोधात होत्या व हे सर्व
संस्थेमार्फत रेकॉर्ड करण्यात आले व त्यास पोलिसांकडे सोपविले. पुढची सर्व
प्रक्रिया आशाताई, त्यांचे पति, डॉ.
निलीमा, फ्लाईंग स्वान व पोलिस यांच्या मदतीने पूर्ण झाली.
यापासून छकुलीला लांब ठेवण्यात आले व ती पुन्हा हसू-खेळू लागली, खोड्या करू लागली...
(ह्या सत्यकथेतील प्रसंग नि:शब्द
करून टाकणारा होता. ही जरी एकच कथा असली तरी सध्या आपल्या आजू-बाजूची काय
परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी वाचा नि:शब्द चा पुढील ब्लॉग.)

No comments:
Post a Comment