नि:शब्द झालेल्यांना मिळाले, कायद्याचे शब्द (ताकद) – ३
लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२
(The Protection Of Children From Sexual
Offence Act. 2012)
२०१२ मध्ये घडलेले निर्भया बलात्कार प्रकरण, तत्सम
त्यापूर्वी व तेंव्हा घडलेल्या अनेक घटनांमुळे कायदे अधिक सक्षम करण्याची गरज वाटत
होती. यावर अनेक चर्चा, मत-मतांतरे झाल्यावर हा सुधारीत कायदा लोकांसमोर आला. या
कायद्यातील प्रत्येक गोष्ट मांडण्याचा प्रयत्न या ब्लॉग मधून करत आहे.
या पकायद्यातील प्रकरणांत फक्त अत्याचाराच स्वरुप दिलेले
आहे व त्याखाली त्या-त्या गुन्ह्यांची शिक्षा अशा पद्धतीने दिले गेले आहे.
प्रकरण – १
१ (१) लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२
साली अस्तित्वात आला.
(२) हा कायदा
जम्मू- काश्मीर हे राज्य सोडून संपूर्ण भारताला हा कायदा लागू होतो.
२ व्याख्या
I.
अत्यंत गंभीर स्वरुपाचा लैंगिक अत्याचार
II.
गंभीर स्वरुपाचा लैंगिक अत्याचार
III.
लष्करदल (आर्मंड फोर्सेस) , सुरक्षा दल (सेक्युरीटी
फोर्सेस) पोलिस दल अंतर्भूत
IV.
बालक म्हणजे १८ वर्षांच्या आतील मूल होय.
V.
कौटपंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५
मधील कलम 2(f) नमूद केलेले कौटुंबिक नाते संबंध.
VI.
लिंग प्रवेशाचा अत्याचार.
VII.
ह्या कायद्यअंतर्गत ठरवलेले नियम
VIII.
धार्मिक संस्था याचा अर्थ धार्मिक संस्था (गैरवापर
प्रतिबंध) कायदा १९८८ प्रमाणे (रिलिजीयस इंस्टिटिट्यूशनल प्रिवेन्शन ऑफ मिसयुज अॅक्ट
१९८८)
IX.
लैंगिक अत्याचार
X.
लैंगिक छळ
XI.
कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा २००५
प्रमाणे सामायिक घरात राहणारे बालक
XII.
विशेष न्यायालये
XIII.
विशेष सरकारी वकील
इत्यादी
माहिती दिली आहे.
प्रकरण
२
३
अत्यंत गंभीर स्वरुपाचा लैंगिक अत्याचार –
i.
योनीमार्ग किंवा रुदव्दारामध्ये लिंग प्रवेश म्हणजे
लिंगप्रवेशाचा आघात तसेच या कायद्यामध्ये कोणतीही वस्तू, शरीराचा कोणताही भाग
बालिकेच्या योनीमार्ग तसेच बालिकेच्या किंवा बालकाच्या गुदव्दारामध्ये सरकवणे
किंवा बालक अथवा बालिकेला तसे करावयास लावणे ही कृती या अत्याचारात गृहीत धरली
जाते.
ii.
लिंग प्रवेशाच्या हेतूने बालकाच्या शरीराचा उत्तेजित
होण्यासारखा कोणताही भाग हाताळणे किंवा बालक अथवा बालिकेला करायला लावणे.
iii.
बालक किंवा बालिकेचे लिंग, योनी, गुदव्दार या अवयवांना मुख
लावणे अथवा बालक किंवा बालिकेला तसे करावयास लावणे.
4
शिक्षा:
वरील
गुन्ह्यांसाठी किमान 7 वर्षे सश्रम किंवा सामान्य कारावास अशी शिक्षा आहे परंतु तो
आजीवन कारावासातही परावर्तित होऊ शकतो. याखेरीज दंड देण्याचेही प्रावधान आहे.
5
गंभीर स्वरुपाचा भेदणारा लैंगिक अत्याचार (अॅग्रेवेटेड् पेनेट्रेटीव्ह सेक्शुअल
अॅसॉल्ट) :
I.
पोलिस अधिकारी जेंव्हा असा अत्याचार करतो, तेंव्हा त्याच्या
कार्यक्षेत्रात असताना, कामावर असताना किंवा नसताना, गणवेश असताना किंवा नसताना
जिथे तो पोलिस अधिकारी म्हणून ओळखला जातो.
II.
लष्करातील किंवा सुरक्षा दलातील व्यक्तीने या प्रकारचा
लैंगिक अत्याचार केला असता तो त्याच्या कार्यक्षेत्रात असतना किंवा नसताना,
गणवेशात असताना किंवा नसताना, जिथे तो त्याच्या लष्करातील किंवा सुरक्षा दलातील
अधिकारी म्हणून ओळखला जातो.
III.
सरकारी करमचारी उदा. तुरूंगातील कर्मचारी रिमांड होम,
सुरक्षा गृह किंवा कायद्याने बालकांना ठेवण्यासाठी, काळजी घेण्यासाठी निश्चित
केलेली जागा अशा ठिकाणच्या बालकासोबत गंभीर स्वरुपाचा भोदणारा लैंगिक अत्याचार
करतो.
IV.
सरकारी किंवा खाजगी दवाखान्याचे कर्मचारी किंवा व्यवस्थापक
त्या दवाखान्यामधील बालकावर असे अत्याचार करेल तर,
V.
शिक्षण संस्था किंवा धार्मिक संस्थेशी संबंधित व्यक्ती
बालकावर अशा प्रकारचा अत्याचार करेल तर,
VI.
जेंव्हा एक गट सामुहिक भेदणा-या लैंगिक अत्याचाराचा हेतू
साध्य करण्यासाठी अशा कृतीमध्ये सहभागी होतो तेंव्हा प्रत्येकाला तेवढेच दोषी
समजले जाईल.
VII.
भयंकर शस्त्र, आग, गरम पदार्थ किंवा कोणतीही त्रासदायक
वस्तू घेऊन बालकाच्या शरीराला किंवा लैंगिक अवयवाला इजा करतो.
VIII.
ज्या कारणमुळे बालक मनोरुग्ण बनेल किंवा नैसर्गिक क्षमतांवर
विघातक परिणाम होईल, बालक काही काळासाठी किंवा कायमस्वरुपी काही नैसर्गिक कृती करू
शकणार नाही.
IX.
अशा लैंगिक अत्यचारामुळे बालिका गरोदर राहिली असेल तर,
X.
अशा लैंगिक अत्यचारामुळे बालकाला एच्.आय.व्ही. किंवा जीवाला
धोका पोहोचणा-या कोणत्याही रोगाची लागण झाली असता,
(नि:शब्द झालेल्यांना मिळाले, कायद्याचे शब्द (ताकद)– ३ यात
आपण लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा २०१२ पाहत आहोत, पुढच्या ब्लॉग
मध्ये आपण याच कायद्यातील पुढील भाग पाहू.)

Play Live Dealer Games at Casino.info
ReplyDeleteLive dealer games are the most popular of them. Play 토토 커뮤니티 the 실시간 배팅 사이트 best games online at casino.info. Find out more about 골인 벳 먹튀 the best 젖탱 casino.info bonuses, 봄비벳 promotions and